मारहाणीच्या निषेधार्त निवासी डॉक्टर सामूहिक रजेवर

Foto

औरंगाबाद: पश्चिम बंगाल मध्ये डॉक्टराला झालेल्या मारहाणीच्या निषेधार्त आज शासकीय वैधकीय महाविद्यालय व रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी सामूहिक राजा टाकत कामबंद आंदोलन केले. सकाळी ८ ते  संध्याकाळी पाच वाजेपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार

पश्चिम बंगाल येथे एका इंटर्न डॉक्टराला बेदम मारहाण करण्यात आली होती. या मारहाणीच्या निषेधार्त आज औरंगाबाद येथील शासकीय वैधकीय महाविद्यालय व रुग्णालयातील १६० पैकी सुमारे १०० निवासी डॉक्टरांनी सामूहिक रजा घेतली व काम बंद आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाचा रुग्णसेवेवर   परिणाम  झालेला नाही मात्र काही किरकोळ शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या आहेत. कामावर असलेली निवासी डॉक्टरांनी काळ्या फित्या बांधून घटनेचा निषेध केला आहे. हे आंदोलन सकाळी 8वाजेपासून ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत सुरू राहणार आहे अशी माहिती आंदोलक डॉक्टरांनी दिली.

आंदोलनाचा रुग्णसेवेवर परिणाम नाही
मारहाणीच्या निषेधार्थ मार्ड संघटनेच्या वतीने सामूहिक रजा टाकत काम बंद आंदोलन केले आहे. याचा रुग्णसेवेवर परिणाम नाही.अत्यावश्यक सेवा सुरु आहे अशी माहिती वैधकीय अधीक्षक डॉ कैलास झिने यांनी दिले.